मुंबई : प्रतिनिधी
करोनाचा वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना 31 मार्चपर्यंत सुटी जाहीर करण्यात आली आहे, मात्र दहावी आणि बारावीच्या परीक्षा वेळापत्रकानुसारच होणार आहेत. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने शिक्षण विभागाला हे पत्रक पाठवले आहे.
कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा लागू करण्यात आला आहे. कोरोनाला रोखण्यासाठी आणि गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व महापालिका, नगर परिषद आणि नगरपंचायत क्षेत्रातील सर्व सरकारी आणि खासगी शाळा, महाविद्यालये 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश सरकारने दिले आहेत. दहावी आणि बारावीच्या परीक्षांबरोबरच विद्यापीठांमधील परीक्षा वेळापत्रकानुसारच होतील, असेही पत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
मृतांच्या कुटुंबीयांना मिळणार चार लाखांची मदत
नवी दिल्ली : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्नशील असणार्या केंद्र सरकारने या आजाराला राष्ट्रीय आपत्ती घोषित केले असून, कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना चार लाख रुपयांची मदत देण्याचे जाहीर केले आहे. देशातील सर्व राज्य सरकार राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद कोषातून (एसडीआरएफ) आर्थिक सहाय्य मिळवू शकतील, तसेच कोरोना रुग्णांसाठी काम करणार्या, तसेच कोरोनाविरोधी मोहिमेत सहभागी असलेल्यांनाही मदत दिली जाणार असल्याचे गृहमंत्रालयाने म्हटले आहे.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper