मुंबई : प्रतिनिधी
राज्यात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने फेब्रुवारीच्या सुरुवातीला पावसाचा अंदाज वर्तविला आहे. त्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटाच्या छायेखाली आहे.
महाराष्ट्रात 5 ते 11 फेब्रुवारीदरम्यान पावसाळी वातावरण असेल. उत्तरेकडील पट्ट्यात आणि दक्षिण टोकाला काही प्रमाणात पावसाची शक्यता आहे तसेच कोकण, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्याध्ये तुरळक ठिकाणी पावसाळी वातावरण निर्माण होण्याचा अंदाज आहे. पाऊस पडला आंबा, काजूसह भाजीपाला आणि इतर पिकांवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची भीती आहे.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper