पेण : प्रतिनिधी
राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी (दि. 8) पेण तालुक्यातील रावे येथे छापा टाकून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे, उपअधीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड विभागाचे निरीक्षक आनंद पवार व त्यांच्या पथकातील दुय्यम निरीक्षक अकुंश बुरकुल, रमेश चाटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक श्रीमती नरहरी, जवान गणेश नाईक, गणेश घुगे यांनी मंगळवारी रावे गावात छापा टाकून धडक कारवाई केली. या कारवाईत गावठी दारू, रसायन असा एकूण एक लाख 38 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.
RamPrahar – The Panvel Daily Paper