Breaking News

‘रानसई’चा पाणीसाठा संपुष्टात; डेडस्टॉकमधून करावा लागणार पाणीपुरवठा

उरण : प्रतिनिधी
उरण परिसराला पाणीपुरवठा करणार्‍या रानसई धरणातील पाण्याचा साठा संपुष्टात आला आहे. त्यामुळे धरणात आता 15 दिवस पुरेल इतकाच पाण्याचा साठा उरला आहे. त्यामुळे याआधीच पाणी टंचाईची झळ सोसणार्‍या दिड लाख संख्येच्या उरणकरांना गुरुवारी रात्रीपासूनच धरणातील डेड स्टॉकमधून पाणीपुरवठा करण्याची वेळ एमआयडीसीवर येऊन ठेपली आहे. दिड लाख लोकसंख्येच्या उरणकरांची तहान भागविण्यासाठी तालुक्यातील रानसई एकमेव धरण आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या अखत्यारीत असलेल्या या रानसई धरणातूनच उरण तालुक्यातील 37 ग्रामपंचायती, उरण नगरपरिषद आणि परिसरातील काही औद्योगिक कंपन्यांना पाणीपुरवठा केला जातो. मात्र यावर्षी रानसई धरणाची पाणीपातळी खालावली. त्यातच जुनचे 15 दिवस उलटून गेल्यानंतरही पाऊस बरसला नाही. पावसाने दडी मारल्याने रानसई धरणातील पाण्याचा साठा काल संपुष्टात आला आहे. त्यामुळे उरण शहर आणि 35 ग्रामपंचायतींना धरणातील डेड स्टॉकमधुन पाणीपुरवठा करण्याची वेळ एमआयडीसीवर येऊन ठेपली आहे. धरणाच्या डेड स्टॉकमध्येही 30 जुन 2022पयर्ंतच पुरेल इतकाच पाण्याचा साठा उरला आहे. याआधीच पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी आठवड्यातील एका शुक्रवारी पाणी कपात केली आहे.

नागरिकांनी पाणी जपून वापरावे
पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. धरणातील डेड स्टॉकमधून पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. नागरिकांनी पाणी वाया न घालविता पाण्याचा जपून वापर करावा.
-रवींद्र चौधरी, एमआयडीसी उपअभियंता, उरण

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply