Breaking News

रामवाडीजवळ मारुती गाडीची टेम्पोला धडक; चार जण किरकोळ जखमी 

पेण : प्रतिनिधी

मुंबई-गोवा महामार्गावरील रामवाडी पुलावर पहाटेच्या सुमारास मारुती इको गाडीने उभ्या असलेल्या आयशर टेम्पोला धडक दिली. या अपघातात चार जण जखमी झाले असून त्यात तीन वर्षाच्या मुलाचा समावेश आहे. मारुती इको गाडी (एमएच 04 एचएफ 2616) ही मंडणगडवरून मुंबईकडे जात होती. पहाटे 3.15 वाजण्याच्या सुमारास पेण रामवाडी पुलावर बंद पडलेल्या आयशर टेम्पोला (जीजे 16 एयू 5286) मारुती इको गाडीने जोरदार धडक दिली. या अपघातात इको चालक संजय राम सुर्वे (वय 28), चंद्रकांत बालाजी चव्हाण (वय 30), राजन राम सुर्वे (वय 33) आणि रुद्र राजन सुर्वे (वय 3) हे जखमी झाले. पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply