अलिबाग : जिमाका
कोकण विभागात मागील चार-पाच दिवसांपूर्वी पूरस्थिती निर्माण झाली होती. सध्या पाऊस बंद आहे. या भागातील पूरस्थिती नियंत्रणात असून त्यांना आवश्यक ते मदतकार्य करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यातील पूरस्थिती सध्या नियंत्रणात आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 500 व्यक्ती, रत्नागिरी जिल्ह्यातील 757, तर रायगड जिल्ह्यातील तीन हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविले होते. सध्या नागरिक आपापल्या घरी जात आहेत. त्यांना अन्नधान्याचे वितरण व गरजेप्रमाणे वैद्यकीय सेवा पुरविली जात आहे. शेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम सुरू केले आहे. शासकीय आर्थिक मदत वाटप करण्याचे काम सुरू करण्यात येत आहे. रायगड जिल्ह्यात सध्या दोन तात्पुरते निवारा कॅम्प सुरू आहेत. जिल्ह्यातील कार्यरत असलेल्या सैन्य दलाच्या टीम अन्यत्र पाठवण्यात आल्या आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper