पनवेल : रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 4) एकाच दिवसात विक्रमी 721 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली, तर 14 रुग्णांचा बळी गेला. दुसरीकडे दिवसभरात 455 जण बरे झाले. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील 290, अलिबाग 123, माणगाव 54, महाड 49, उरण व खालापूर प्रत्येकी 37, पेण 32, कर्जत 28, रोहा 24, तळा 14, सुधागड व पोलादपूर प्रत्येकी 13, मुरूड तीन आणि श्रीवर्धन व म्हसळा तालुक्यातील प्रत्येकी दोघांचा समावेश आहे, तर मृत रुग्ण पनवेल तालुक्यात पाच, खालापूर दोन आणि कर्जत, पेण, मुरूड, माणगाव, तळा, रोहा व म्हसळा प्रत्येकी एक असे आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 30,038 व मृतांची संख्या 870 झाली आहे. जिल्ह्यात 24,794 जण कोरोनामुक्त झाल्याने 4,374 विद्यमान रुग्ण आहेत.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper