पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात गुरुवारी (दि. 19) नवे 126 कोरोना पॉझिटिव्ह व एका रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. तर 159 रुग्ण बरे झाले आहेत. पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 85 व ग्रामीण 17) तालुक्यातील 102, अलिबाग आठ, रोहा सहा, खालापूर, पेण, माणगाव येथे प्रत्येकी दोन, उरण, कर्जत, श्रीवर्धन, महाड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे. मयत रुग्णामध्ये उरणमधील एकाचा समावेश आहे. न व् य ा रु ग् ण ा ं म ु ळ ेजिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 55,853 आणि मृतांची संख्या 1589 झाली आहे. आतापर्यंत 53,416 जण कोरोनामुक्त झाल्याने 848 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper