पनवेल ः रामप्रहर वृत्त
रायगड जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या सातत्याने घटत असून, बुधवारी (दि. 11) नव्या 98 रुग्णांची आणि एक जणाच्या मृत्यूची नोंद झाली, तर दिवसभरात 125 रुग्ण बरे झाले आहेत.
पॉझिटिव्ह आढळलेल्या रुग्णांमध्ये पनवेल (मनपा 52 व ग्रामीण 14) तालुक्यातील 66, माणगाव नऊ, खालापूर सात, महाड पाच, रोहा चार, कर्जत व अलिबाग प्रत्येकी दोन, उरण, पेण व सुधागड तालुक्यातील प्रत्येकी एकाचा समावेश आहे, तर मयत एक रुग्ण पनवेल तालुक्यातील आहे.
नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा 55,207 आणि मृतांची संख्या 1577 झाली आहे. आतापर्यंत 52,597 जण कोरोनामुक्त झाल्याने 1033 विद्यमान रुग्ण आहेत, अशी माहिती प्रशासनाने दिली.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper