ऑनलाईन फॉर्म भरण्यास 10 सप्टेंबरपर्यंत अंतिम मुदत
अलिबाग : जिमाका
रायगड जिल्हा होमगार्ड अंतर्गत पथक, उपपथकामधील पुरुष, महिला होमगार्ड सदस्य नोंदणी 16 व 17 सप्टेंबर 2019 रोजी रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय, अलिबाग येथे सकाळी 7.00 पासून घेण्यात येणार आहे.
नोंदणीसाठी इच्छुक उमेदवारांनी सप्टेंबरपर्यंत (हीींिीं://वपूरपक्षूेींळीरींरीर.ळप/हसारहर/श्रेसळप1हिि) या संकेतस्थळावर जाऊन कॠड एछठजङङचएछढ मधील जछङखछए एछठजङङचएछढ ऋजठच् मध्ये ऑनलाईन फॉर्म भरावे. झीळपीं ठशसळीीींरींळेप ऋेीामध्ये जाऊन फॉर्मची प्रिंट काढून ही प्रिंट मूळ कागदपत्रांसह व त्यांच्या छायांकित प्रतिसह रायगड जिल्हा पोलीस मुख्यालय अलिबाग येथे कवायत मैदानावर अलिबाग, पेण, रोहा, खालापूर (चौक), मुरूड तालुक्यातील उमेदवारांनी 16 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 11 या वेळेत उपस्थित राहावे, तर महाड, माणगाव, म्हसळा, पोलादपूर, तळा, सुधागड-पाली तालुक्यातील उमेदवारांनी 17 सप्टेंबर रोजी सकाळी 7 ते 11 या वेळेत उपस्थित राहावे.
कागदपत्रे व शारीरिक चाचणी तपासणीमध्ये पात्र झालेल्या उमेदवारांची गोळाफेक व धावणे मैदानी चाचणी घेण्यात येईल. उमेदवारांना नोंदणीस स्वखर्चाने यावे लागेल, तसेच नोंदणीच्या, मैदानी चाचणीच्या वेळी कोणतेही अपघाती घटना घडल्यास त्याची जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहील. उमेदवारांची निवड पूर्णपणे गुणवत्तेवर करण्यात येईल. होमगार्ड ही मानसेवी संघटना असून ती वेतनीय नाही. पनवेल, उरण, कर्जत व नेरळ या होमगार्ड पथकातील अनुशेष शिल्लक नसल्याने तेथील उमेदवारांनी नोंदणी अर्ज भरू नयेत व नोंदणी प्रक्रियेत हजर राहू नये, असे रायगड जिल्हा समादेशक होमगार्ड यांनी कळविले आहे.
होमगार्ड नोंदणीकरिता पात्रतेचे निकष पुढीलप्रमाणे-
शिक्षण कमीत कमी दहावी उत्तीर्ण. वयोमर्यादा 20 ते 25 वर्ष (दि. 1 सप्टेंबर 2019 रोजी). उंची पुरुषांकरिता 162 सें.मी. व महिलांकरिता 150 सें.मी., छाती पुरुषांकरिता 76 सें.मी. व फुगवून 81 सें.मी. (छाती 5 सें.मी. फुगवता येणे आवश्यक आहे). खेळाडू, आयटीआय, जडवाहन परवानाधारक, एनसीसी, बी व सी प्रमाणपत्र धारक, माजी सैनिक, नागरी संरक्षण असलेले, परंतु स्थानिक ठिकाणी तीन प्रशिक्षण पूर्ण केलेले प्रमाणपत्र धारक यांना तांत्रिक अर्हता गुण दिले जातील.
नोंदणीकरिता आवश्यक कागदपत्रे पुढीलप्रमाणे-
रहिवासी पुरावा (आधारकार्ड, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र), वय, शाळा सोडल्याचा दाखला, दहावी किंवा बारावी बोर्ड प्रमाणपत्र, तांत्रिक अर्हता धारण करीत असल्यास तत्सम प्रमाणपत्र, नुकतेच काढलेले पासपोर्ट साईज दोन फोटो.
RamPrahar – The Panvel Daily Paper