Breaking News

रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षपदी सीता पाटील

पनवेल ः वार्ताहर
रायगड जिल्हा सॉफ्ट टेनिस असोसिएशनच्या अध्यक्षपदी पनवेल महापालिकेच्या नगरसेविका सीता सदानंद पाटील यांची एकमताने निवड करण्यात आली आहे. या खेळाचा प्रचार आणि प्रसार जिल्ह्यात करून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू निर्माण केले जातील, असे पाटील यांनी सांगितले.
असोसिएशनच्या उपाध्यक्षपदी सुजाता वारंगे, सचिवपदी स्वप्नील वारंगे, सहसचिव म्हणून श्वेता वळुंज, हेमंत पेयर यांची खजिनदार म्हणून नियुक्ती करण्यात आली. सुप्रिया गांगण सहखजिनदार म्हणून काम पाहतील, तर नंदू वारगुटे, विशाल खुटवड, यतीराज पाटील यांची कार्यकारिणी सदस्य असणार आहेत.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply