Breaking News

रायगड जिल्ह्यातील मुली ठरल्या ‘बारावी’त अव्वल

अलिबाग : मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेत रायगड जिल्ह्याचा निकाल 84.97 टक्के लागला. उत्तीर्ण होण्यात यंदाही मुलींनी बाजी मारली आहे. 80.05 टक्के मुले तर 90.63 टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. बारावीच्या परीक्षेला 14  हजार 338 मुली बसल्या होत्या, त्यातील 12 हजार 994 मुली उत्तीर्ण झाल्या. 90.63  टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

माणगाव ज्युनिअर कॉलेजचे नेत्रदीपक यश

माणगाव : प्रतिनिधी

माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या ज्युनिअर कॉलेजने    बारावीच्या परीक्षेत नेत्रदिपक यश संपादीत केले आहे.  या ज्युनिअर कॉलेजच्या कला शाखेचा निकाल 73.23, वाणिज्य शाखेचा 97.72, तर विज्ञान शाखेचा  निकाल 100 टक्के लागला आहे.

कॉलेजच्या कला शाखेचे 216 विद्यार्थी 12वी परीक्षेला  बसले होते. त्यापैकी 156 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यामध्ये  मंजुषा बळीराम चव्हाण (78.31 टक्के), अंजली धम्मपाल मेश्राम (68 टक्के), बेबी नगीनाप्रसाद शाह (67.54 टक्के) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. सागर शिर्के आणि वैभवी शांताराम गोसावी (62.46 टक्के) संयुक्तपणे चतुर्थ क्रमांक मिळविला. तर अक्षता विकास तेलंगे (60.62) हिच पाचवा क्रमांक मिळविला.

या कॉलेजच्या वाणिज्य शाखेचे एकूण 176 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. त्यापैकी 172 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यात   रेष्मा रमेश बावदाने (79.69 टक्के) प्रथम, पूजा प्रकाश कापरे (78 टक्के) द्वितीय, तर अस्मिता सेल्वादेवर मोकास्वामी  (77.53 टक्के) तिसरी आली. विज्ञान शाखेचे एकूण 207 विद्यार्थी बारावी परीक्षेसाठी बसले होते. ते सर्व उत्तीर्ण झाले. त्यात आशिष  गोनबरे (86.15 टक्के) पहिला, आदेश लाड (83.38 टक्के) दूसरा तर वसंत धुरी (81.23 टक्के) तिसरा आला आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply