अलिबाग ः जिमाकारायगड जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 29.49 मिमी इतक्या पावसाची नोंद झाली आहे. तसेच 1 जूनपासून आज अखेर एकूण सरासरी 363.36 मिमी पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. गुरुवारी सकाळी प्राप्त दैनंदिन पर्जन्यमान अहवालानुसार अलिबाग 2.00 मिमी, पेण 9.00 मिमी, मुरूड 24.00 मिमी, पनवेल 0.00 मिमी, उरण 2.50 मिमी, कर्जत 0.00 मिमी, खालापूर 7.00 मिमी, माणगाव 36.00 मिमी, रोहा 11.00 मिमी, सुधागड 14.00 मिमी, तळा 30.00 मिमी, महाड 30.00 मिमी, पोलादपूर 51.00 मिमी, म्हसळा 88.00 मिमी, श्रीवर्धन 167.00 मिमी, माथेरान 0.40 मिमी असे एकूण पर्जन्यमान 471.90 मिमी इतके आहे. त्याची सरासरी 29.49 मिमी आहे. एकूण सरासरी पर्जन्यमानाची टक्केवारी 11.56 टक्के इतकी आहे.
Check Also
‘लाडक्या बहिणी’ महायुतीच्या पाठीशी -आमदार प्रशांत ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग 14 मध्ये झालेली विकासकामे आणि ’लाडकी बहीण’ योजनेचा …