Breaking News

रायगड पोलिसांकडून कोरोना योद्धा बनण्याची संधी

खोपोली : बातमीदार

कोरोना विषाणू लढाईत आता सर्वसामान्य नागरिकाला देखील कोरोना योद्धा बनण्याची संधी रायगड पोलीस दलातर्फे देण्यात आली असून त्यासाठी पात्रता निकषात बसल्यास कोरोना योद्धा म्हणून सेवा बजावता येणार आहे.

लॉकडाऊनच्या तिसर्‍या टप्प्यात रायगड ऑरेंज झोनमध्ये असला तरी पोलीस दल मात्र कोणत्याही प्रकारची बेफिकिरी बाळगण्याच्या मनस्थितीत नाही. पहिल्या दोन टप्प्यात रायगडवासीयांनी दाखविलेला संयम आणि जबाबदारीची वागणूक याचे कौतुक करताना पोलीस अधीक्षक अनिल पारसकर यांनी तिसर्‍या टप्प्यात अधिक सजग राहण्याचे आवाहन केले आहे.रायगड पोलीस विविध माध्यमातून जनतेशी संवाद साधत असताना अनेकांनी कोरोना लढाईत पोलीस, डॉक्टर यांच्या बरोबरीने काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक पारसकर यांनी कोरोना योद्धा संकल्पना तयार केली आहे.

लॉकडाऊनच्या सर्व नियमांचे पालन करणारा, स्वतःबरोबर कुटूंब आणि शेजारी यांना लॉकडाऊनबाबत जागरूक ठेवणार्‍या व्यक्तीला कोरोना योद्धा होण्याची संधी मिळणार आहे. आसपास कोणीही व्यक्ती, आस्थापना लॉकडाऊन नियमांचे पालन करत नसतील तर त्याचा फोटो काढून फोटो खाली वेळ, दिनांक व ठिकाण नमूद करून फोटो 7447711110 या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाठविण्याचे आवाहन रायगड पोलीस दलाकडून करण्यात आले आहे.अशाप्रकारे माहिती देणार्‍या कोरोना योद्ध्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येणार आहे. फोटोच्या पडताळणीनंतर  पोलिसांकडून योग्य ती कारवाई करण्यात येणार असून खोटी किंवा चुकीची माहिती दिल्यास संबधितावर गुन्हा दाखल होईल असे, पोलीस अधीक्षक यांच्या प्रसिद्धी पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply