पनवेल : बातमीदार
कोल्हापूर येथे होणार्या राज्यस्तरीय शालेय रायफल शूटिंग स्पर्धेत पनवेल तालुक्यातील नेरे येथील वेदांत किसन खारके याची निवड करण्यात आली आहे. जिल्हा क्रीडा अधिकारी रायगड आयोजित शालेय 14 वर्षांखालील 10 मिटर पिस्तूल नेमबाजीत पनवेलच्या प्रूडन्स इंटरनॅशनल स्कूलचा विद्यार्थी वेदांत खारके याने लक्ष शूटिंग क्लब येथे सुवर्णपदक जिंकले होते. त्यामुळे त्याची मुंबई झोनलला निवड झाली होती. या स्पर्धेत त्याने रौप्यपदक मिळविले. त्यामुळे 23 ऑक्टोबर रोजी कोल्हापूर येथे होणार्या राज्य पातळीवरील नेमबाजी
स्पर्धेसाठी त्याची निवड करण्यात आली आहे.या निवडीमुळे प्रशिक्षक किसन खारके (राष्ट्रीय नेमबाज) व रमेश माळी यांनी वेदांतला शुभेच्छा दिल्या आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper