Breaking News

’राष्ट्रवादीकडून निवडून येण्याचे दिवस गेले; शिवेंद्रराजेंनी दिला राजीनामा

मुंबई : प्रतिनिधी – शिवेंद्रराजे हे भाजपमध्ये जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे. जावळी मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रराजे यांनी आपला राजीनामा विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे सुपूर्द केला आहे. शहराच्या विकासासाठी भाजपत प्रवेश करण्याच्या आमदार शिवेंद्रराजे यांच्या भूमिकेला प्रमुख पदाधिकारी, आजी-माजी नगरसेवक यांनी पाठिंबा दर्शविला आहे. राष्ट्रवादीकडून निवडून येण्याचे दिवस आता गेले, असे ते म्हणाले. शिवेंद्रराजेंबरोबर 22 जिल्हा परिषद सदस्य आणि 9 जिल्हा बँकेचे संचालक भाजपमध्ये जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आमदार शिवेंद्रराजे यांनी नगर विकास आघाडीच्या पार्लमेंटरी बोर्डासह आजी- माजी नगरसेवकांची तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीत मतदान वाढविण्याबाबत प्राथमिक बोलणी झाल्यानंतर आ. भोसले यांनी उपस्थितांना भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी संपर्क झाल्याचे सांगून पक्षांतर करण्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, कोणावरही रुसून, रागावून किंवा वाद आहेत म्हणून पक्ष सोडण्याचा विचार नाही. गेल्या पाच वर्षांत सत्तेपासून लांब राहिल्यामुळे अनेक विकासकामांवर त्याचा विपरीत परिणाम होऊ लागला आहे. विकासकामांसाठी निधी उपलब्ध होण्याबरोबरच अनेक अडचणी येतात. त्यामुळे सत्तेत असलेल्या भाजपसोबत राहणेच हिताचे आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply