पनवेल : वार्ताहर
नाशिकमध्ये झालेल्या राष्ट्रीय तलवारबाजी स्पर्धेत पनवेल येथील मनस्वी जयेश भगत हिने एक सुवर्ण व एक रौप्यपदक पटकाविले. मनस्वीने महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना संघास इपी वैयक्तिक या प्रकारात रौप्यपदक व सांघिक या प्रकारात सुवर्णपदक मिळवून दिले.
या स्पर्धेत भारतातील 25 राज्यांतून जवळपास 500हून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते. यामध्ये पनवेल तालुक्यातील चॅम्पियन्स क्लबमधून सात खेळाडूंनी सहभाग नोंदविला. यामध्ये मनस्वी भगत, प्रज्वल गौडा, अर्श सुरवसे, आराध्या वासगडेकर, श्रेया गडेगावकर, तनया पालसोकर, पार्थ मेढेकर यांनी दमदार कामगिरी केली. त्यांना मिलिंद ठाकूर, सिद्धार्थ म्हसकर, प्रशांत भगत यांचे प्रशिक्षण लाभले तसेच वैभव पेटकर यांनी मार्गदर्शन केले
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper