Breaking News

राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंची सुवर्ण कामगिरी

पाली ः प्रतिनिधी
इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनतर्फे इंडोर स्पोर्ट्स स्टेडियम, पोलो ग्राऊंड, श्रीनगर काश्मीर येथे पार पडलेल्या सीनियर राष्ट्रीय पिंच्याक सिल्याट स्पर्धेत महाराष्ट्रातील खेळाडूंनी रेगू इव्हेंटमध्ये चमकदार कामगिरी केली. पालीतील अनुज सरनाईक तसेच विशाल मोरे, ओमकार अभंग यांनी स्पर्धेत सुवर्णपदक पटकावले.      
तसेच स्टँडिंग (फाइट) या इव्हेंटमध्ये अंशुल कांबळे व ओमकार अभंग यांनी सुवर्णपदक पटकावले. बुलडाणामधील जयश्री शेट्टे, प्रियांका पवार यांनी कांस्यपदक पटकावले. या विजेत्यांना इंडियन पिंच्याक सिल्याट फेडरेशनचे अध्यक्ष किशोर येवले यांच्या हस्ते मेडल प्रदान करण्यात आले.

Check Also

‘लाडक्या बहिणी’ महायुतीच्या पाठीशी -आमदार प्रशांत ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल महापालिकेच्या माध्यमातून प्रभाग 14 मध्ये झालेली विकासकामे आणि ’लाडकी बहीण’ योजनेचा …

Leave a Reply