पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेत कुस्ती प्रकारात रयत शिक्षण संस्थेच्या रिटघर येथील श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते उच्च माध्यमिक विद्यालयाने यश प्राप्त केले आहे. विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांनी कुस्ती स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविला.
नावडे येथील प. जो. म्हात्रे विद्यालय येथे झालेल्या तालुका क्रीडा स्पर्धेत श्री भैरवदेव विद्यालय व लोकनेते उच्च माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी निखिल विश्वनाथ भोपी याने कुस्ती प्रकारात 55 किलो वजनी गटात आणि 92 किलो वजनी गटात सिद्धेश नरेश भोपी याने प्रथम क्रमांक प्राप्त केला. त्यांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या विद्यार्थ्यांना कुस्तीपटू विश्वनाथ भोपी यांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल रयत शिक्षण संस्थेचे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य व रिघटर विद्यालयाचे चेअरमन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, स्थानिक स्कूल कमिटी सदस्य, शिक्षकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आणि त्यांना जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
Check Also
जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर
पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …
RamPrahar – The Panvel Daily Paper