Breaking News

रेवदंडा ग्रामपंचायतीकडून मास्क, सॅनिटायझरचे वाटप

रेवदंडा ः प्रतिनिधी

कोरोनाच्या संकटकाळात रेवदंडा ग्रामपंचायतीच्या वतीने विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. त्या अनुषंगाने ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर वाटपाचा कार्यक्रम नुकताच हाती घेण्यात आला. याशिवाय सुरक्षेसाठी ग्रामस्थ व युवकांच्या सहकार्याने नाक्यानाक्यावर तपासणी करण्यात येत आहे.

रेवदंडा ग्रामपंचायत प्रांगणात ग्रामस्थांना मास्क व सॅनिटायझर वाटपाचा प्रारंभ सरपंच मनीषा चुनेकर यांच्या हस्ते करण्यात आला. या वेळी ग्रा. पं. सदस्य शरद गोंधळी, संतोष मोरे, संदीप खोत, सलीम तांडेल, मिलिंद चुनेकर, पोलीस पाटील स्वप्निल तांबडकर, विवेक दांडेकर, रेवदंडा ग्रामस्थ आणि महिला उपस्थित होत्या. या वेळी रेवदंडा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक सुनील महाजन, कर्मचारी सुभाष मानकर, सचिन मयेकर, जितेंद्र पाटील, शहानाज अक्तार आदींनी विशेषपरिश्रम घेतले.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply