Breaking News

रेशन कार्ड धारकांसाठी अ‍ॅप लाँच

आता एका क्लिकवर मिळणार सर्व माहिती

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
सर्वसामान्यांसाठी आता एक खूशखबर आहे. मोदी सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी भारतात मेरा रेशन नावाचे मोबाइल अ‍ॅप लाँच केले आहे. यामध्ये गरजू म्हणजेच गरीब कुटुंबीतील लोकांना रेशन कार्डमध्ये आपली सध्याची स्थिती मिळणार्‍या सुविधांबाबत सर्व माहिती उपलब्ध होऊ शकणार आहे.
मेरा रेशन मोबाइल अ‍ॅप हे अ‍ॅण्ड्राइड स्मार्टफोनसाठी लाँच करण्यात आले आहे. त्यामुळे गुगल प्ले स्टोरवरून युजर्स हे डाऊनलोड करू शकतात. सध्या भारतात कुटुंबातील एका सदस्याकडे तरी स्मार्टफोन असतो. त्यामुळे मोबाईलवर सरकारी योजना आणि मिळणारा लाभ याची माहिती मिळू शकते वन नेशन वन रेशन कार्डच्या पावलावर पाऊल टाकत आता मेरा रेशन हे मोबाइल अ‍ॅप लाँच करण्यात आले आहे. रेशन कार्डधारक जर आपले निवासस्थान बदलून नवीन ठिकाणी जात असेल तर ते मोबाइल अ‍ॅपवर अधिक माहिती मिळवू शकतात. जवळ कोणते रेशन दुकान आहे. त्या किाणी कोणकोणत्या सुविधा दिली जात आहेत हे पाहू शकतात. सरकारी डेटानुसार, देशात 69 कोटी लोक राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्याचा फायदा घेत आहेत त्यांना सर्व सुविधा मिळत आहे. सध्या हे अ‍ॅप हिंदी आणि इंग्रजी अशा दोन भाषेत आहे, परंतु लवकरच ते 14 भाषेत उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
असे करा डाऊनलोड
मेरा रेशन मोबाइल अ‍ॅपचा वापर करणे सोपे आहे. सर्वप्रथम हे अ‍ॅप डाऊनलोड करा. गुगल प्ले स्टोरवर केंद्रीय अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणद्वारे विकसित केलेले अ‍ॅप दिसेल. डाऊनलोड झाल्यानंतर आपला मोबाईल नंबर यात रजिस्टर करा. रजिस्टर झाल्यानंतर तुमचा रेशन कार्ड नंबर मागितले जाईल. नंबर टाकल्यानंतर सबमिट करा. मग रेशन कार्डसंबंधी सर्व माहिती मिळू शकेल, तसेच या अ‍ॅपवर युजर्सना गेल्या सहा महिन्यांतील ट्रान्झॅक्शन आणि आधार सीडिंगची पूर्ण माहिती मोबाइलवर मिळू शकेल.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply