Breaking News

रोडपाली येथे कंटेनर पलटी

पनवेल : वार्ताहर  : भरधाव वेगाने चाललेला कंटेनर वाहन चालकाचा ताबा सुटल्याने पलटी झाल्याची घटना रोडपाली येथे घडली आहे. अशाच प्रकारच्या घटना यापूर्वी सुद्धा घडल्याने गेल्या काही दिवसांपासून या परिसरात अपघातसत्र वाढले आहे. काही दिवसांपूर्वी अशाच प्रकारे एक कंटेनर पलटी झाला होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. असे असतानाच आज रोडपाली सिग्नल येथे पुन्हा एकदा एक कंटेनर पलटी झाल्याने काही प्रमाणात वाहतुकीचा प्रश्न निर्माण झाला होता. तळोजा औद्योगिक क्षेत्रात, तसेच इतर ठिकाणी ये-जा करणारे अनेक कंटेनर या मार्गावरून जात असतात. गेल्या काही दिवसांपासून अशा प्रकारच्या अपघातांमध्ये वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply