Breaking News

रोहा तहसीलच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था

नागोठणे ः प्रतिनिधी

रोहा तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहाची दूरवस्था झाली असून या परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

रोहा तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडेच दुर्लक्ष होत असून येथील अवस्था पाहण्यासारखी राहिलेली नाही. हे स्वच्छतागृह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात असल्याने येथे नेहमी येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना तसेच शासकीय कर्मचार्‍यांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. यामुळे नागरिकांच्या व कर्मचार्‍यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.  या पार्श्वभूमीवर स्वच्छतागृहाची तातडीने दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply