Breaking News

रोहा बाजारपेठेत नागरिकांची गर्दी; सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

रोहे : प्रतिनिधी

कोरोनाच्या पार्श्वभूमिवर रोहा शहरात 7 मेपासून  कडक लॉकडाऊन लावण्यात आला होता. मात्र तो हटवल्यानंतर गुरुवारी (दि. 13) रोहा बाजारपेठेत नागरिकांची प्रचंड गर्दी झाली होती. या वेळी सोशल डिस्टन्सिंगचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसून आले. रोहा तालुक्यातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेवून कडक लॉकडाऊन  लावण्यात आला होता. मात्र तो हटवताच गुरुवारी सकाळपासूनच शहरातील बाजारपेठेमध्ये ग्राहकांची गर्दी उसळली होती. या वेळी नागरिक किराणामाल, भाजीपाला यासह दैनंदिन गरजेच्या वस्तू खरेदी करताना दिसत होते. महत्त्वाचे म्हणजे या काळात शासनाने निर्बंध घातलेली काही दुकानेसुद्धा पूर्णपणे सुरु होती. कोरोना रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने  रोहा तालुक्याची चिंता वाढली आहे. या काळात नागरिकांनी स्वयंशिस्त पाळण्याची आवश्यकता आहे.  मात्र गुरुवारी बाजारपेठेत कुठेही सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नव्हते. दुचाकी व चारचाकीवरून नागरिक बाजारपेठेत खरेदीला आले होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply