Breaking News

रोहा ब्राह्मण मंडळातर्फे मिटकरींच्या वक्तव्याचा निषेध

धाटाव ़: प्रतिनिधी

आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावणारे व हिंदु वैदिक विधींची टिंगलटवाळी करणारे वक्तव्य केले, या वक्तव्याचा व या वक्तव्याला खतपाणी घालण्याचे काम करणार्‍या दोन मंत्र्यांच्या कृतीचा सोमवारी (दि. 25) ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे निषेध व्यक्त करण्यात आला. तसेच  आमदार मिटकरी यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी करणारे निवेदन रोहा तहसीलदार व पोलीस ठाण्यात  देण्यात आले. जिल्हा ब्राह्मण संस्थेचे सचिव सतिश गोडसे, रोहा ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष अमित आठवले, उपाध्यक्ष आनंद काळे, सचिव निखिल दाते, खजिनदार चैतन्य आठवले, कमिटी सदस्य प्रकाश कुंटे, उदय गोखले, श्रीनिवास रिसबुड, विदुला परांजपे, नेहा आवळसकर, समाजातील ज्येष्ठ सदस्य गिरीश पेंडसे, मोहन साठे, पुरुषोत्तम कुंटे, उदय टिल्लू,संतोष दाते, महेश पेंडसे, वैभव भट, दीपक पराडकर, युवा कार्यकर्ते प्रतिक पाटणकर, किरण कानडे, स्वप्नील जोशी आदींसह समाजबांधव या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply