विक्रेत्याला पकडले पोलीस ठाण्यात गुन्हा
रोहा : प्रतिनिधी
रोहा शहरातील रोहा चणेरा मार्गावरील म्हाडा कॉलनीतील एका बंद इमारतीमध्ये गांजा विक्रीस आणलेल्या विक्रेत्याला रोहा पोलिसांनी पकडले आहे. रोहा पोलिसांनी त्या गांजा विक्रेत्याकडून 19 हजार 56 रुपयाचा गांजा जप्त केला आहे.रोहा पोलिसांची अवैध धंद्याच्या विरोधात धडक मोहीम सुरू असून या अंतर्गत अवैध धंदे बंद करण्यासाठी रोहा पोलिसांनी मोहीम आखली आहे. रोहा शहरात अवैद्यरित्या गांजा विक्रीला येत असल्याची रोहा पोलिसांना माहीती मिळताच रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलिसांनी मंगळवारी म्हाडा कॉलनी येथे अवैध गांजा या मादक व नशाकारक अंमली पदार्थाची अवैधरीत्या विक्री करण्याकरता आलेल्या म्हाडा कॉलनी येथील बंद इमारतीमध्ये आरोपीकडून पोलिसांनी गांजा जप्त केला आहे.रोहा पोलिसांनी आरोपीतकडून 1.605 किलोग्रॅम वजनाचा गांजा हा मादक व नशा कारक पदार्थ लाल पिवळ्या रंगाच्या पिशवीमध्ये ठेवलेला 12000 रुपये प्रति किलो प्रमाणे वजनाचे असे एकूण 19056 किमतीचा मुद्देमाल रोहा पोलिसांनी जप्त केला आहे या संबंधित आरोपीच्या विरोधात रोहा पोलीस ठाण्यात एनडीपीएस अधिनियम 1985 चं.क.8(क),20(ब) त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे या संबंधित अधिक तपास रोहा पोलीस निरीक्षक प्रमोद बाबर हे करीत आहेत.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper