मुंबई : प्रतिनिधी
अष्टपैलू खेळाडू, उपकर्णधार रोहित शर्मा याच्यासोबत बेबनाव असल्याच्या बातम्यांचे कर्णधार विराट कोहलीने सोमवारी (दि. 29) स्वत: खंडन केले. आमच्यात बेबनाव असता, तर आम्ही सेमीफायनलपर्यंतचा पल्ला गाठलाच नसता, असे सांगतानाच या सर्व बातम्या हास्यास्पद असल्याचे विराटने सांगितले. विराटच्या या म्हणण्याचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनीही समर्थन केले.
वेस्ट इंडिज दौर्यावर रवाना होण्यापूर्वीच विराटने पत्रकार परिषद घेऊन टीम इंडियात सारे काही अलबेल असल्याचे सांगितले. रोहित व माझ्यात बेबनाव असल्याच्या बातम्या कुठून आल्या हे माहीत नसल्याचेही तो म्हणाला.
RamPrahar – The Panvel Daily Paper