रोहे ः प्रतिनिधी
शहारसह तालुक्यात शुक्रवारी आंतराराष्ट्रीय योगदिन ठिक ठिकाणी योगासने घेऊन साजरा करण्यात आला. शहरातील सर्वच शासकीय कार्यालयात योगदिन निमत्ताने योगासने करण्यात आली.
रोहा शहारातील ज्येष्ठ नागरिक सभागृहात शुक्रवारी सकाळी 7 ते 8.30 वाजण्याच्या दरम्यान योग प्रशिक्षक अजित तलाठी व योग प्रशिक्षक करळे यांनी योगासने करवून घेतली. उपनगराध्यक्ष महेंद्र दिवेकर, गटनेते महेंद्र गुजर, नगरसेवक मजिद पठाण, डॉ. जोशी, तहसिलदार कविता जाधव, मुख्याधिकारी बाळासाहेब चव्हाण, नगर परिषदेचे अधिकारी निवास पाटील, स्वप्नील तोडणकर, जयेश पाटील यांच्यासह महसुल, नगर परीषद कर्मचारी व नागरिक या उपक्रमात सहभागी झाले होते.
रोहा शहरातील ओसवाल भवन येथे योगा प्रशिक्षक तुकाराम काते, विजया सरसंबे यांनी योगाचे धडे दिले. या वेळी दिलीप सोलंकी, वसंत कोठारी, मनोज जैन, भरत जैन, प्रशांत गुजर, दिपक जैन आदी सहभागी झाले होते. रोहा पोलीस ठाण्यात सकाळी आंतराराष्ट्रीय योगदिन साजरा करण्यात आला. त्यात पोलीस निरीक्षक राजकुमार परदेशी, सहाय्यक निरीक्षक शिरोळे, लोणे यांच्यासह अधिकारी व पोलीस कर्मचारी सहभागी झाले होते. रोहा पंचायत समिती कार्यालयात योग प्रशिक्षक तुकाराम काते, सुप्रीया कुंभार, विजया सरसंबे यांनी योगाचे प्रकार व माहिती दिली. या वेळी गटविकास अधिकारी पंडित राठोड, प्रशासन अधिकारी संजय कवितके, निवृत्त अधिकारी सुधाकर वालेकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper