रोहे ः प्रतिनिधी
डॉ. श्री. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या वतीने येथील श्री सदस्यांनी रोहा अष्टमी परिसरातील गणेश विसर्जनाच्या वेळी दोन टन 700 किलो निर्माल्य गोळा केले आहे. या निर्माल्याचे खत तयार करून ते झाडांच्या वाढीसाठी वापरण्यात येणार आहे.पद्मश्री आप्पासाहेब धर्माधिकारी व सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जलप्रदूषणाला आळा घालण्यासाठी राबविण्यात आलेल्या निर्माल्य संकलन उपक्रमांतर्गत दीड, पाच व 10 दिवसांच्या गणपती विसर्जनावेळी रोहा पकटी, स्मशानभूमी, दमखाडी व अष्टमी येथे जाऊन 188 श्री सदस्यांनी दोन टन 700 किलो निर्माल्य गोळा केले. त्यापासून खतनिर्मिती करण्यात येत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper