रोहे : प्रतिनिधी
कोरोनाने पुन्हा डोके वर काढले असून ओमायक्रॉनचे रुग्ण वाढू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर रोहा नगर परिषद व पोलीस विभागाकडून गुरुवारी (दि. 30) बाजारपेठेत विनामास्क वावरणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली. कोरोना प्रादुभाव रोखण्यासाठी शासनाने कोरोना रोखण्यासाठी मार्गदर्शक तत्वे जाहीर केली आहेत. सॅनिटायझरचा वापर करा, मास्क वापरा, गर्दी करु नका, कोरोना प्रतिबंधक लस घ्या यासह कोरोना रोखण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. परंतु काही नागरिक कोरोना नियमांचे पालन करीत नसल्यामुळे रोहा बाजारपेठेत विनामास्क वावरणार्यांवर गुरुवारी रोहा नगर परिषद व पोलिस विभागाने कारवाईचा बडगा उगारला. शहरातील तीनबत्ती नाक्यापासून कारवाई करण्यास सुरूवात करण्यात आली. मास्क न वापरणारे दुकानदार, नागरिक, वाहनचालक यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या कारवाईत नगर परिषद कर्मचारी, रोहा पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक अविनाश ढाकरे यांच्यासह पोलीस व वाहतूक कर्मचारी सहभागी झाले होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper