Breaking News

रोह्यात 24 दुकानदारांवर दंडात्मक कारवाई

धाटाव : प्रतिनिधी

कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍या रोहा नगर परिषद हद्दीतील 24 व्यापार्‍यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली.

रोहा नगर परिषद अत्यावश्यक सेवेखाली काही दुकाने बिनधास्त सुरु आहेत, काही दुकानदार मास्क न वापरता ग्राहकांना सेवा देत आहेत. मिनी लॉकडाऊनच्या काळात कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन करणार्‍या व्यापार्‍यांवर पोलीस व नगर परिषद प्रशासनाने दडांत्मक कारवाई करण्यात सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून नियमांचे उल्लंघन करणार्‍या रोहा शहरातील 24 व्यापार्‍यांवर पोलीस व नगर परिषद प्रशासनान यांनी संयुक्तपणे दंडात्मक कारवाई केली.

दरम्यान, मोठ मोठे उद्योग, कंपन्या सुरु आहेत.  हजारो कामगार एकत्र काम करतात. मग छोटे उद्योगधंदे, दुकाने बंद का ठेवावी, असा सवाल व्यापारी वर्ग करीत आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply