Breaking News

लसीकरणासाठी लकी ड्रॉची नामी शक्कल

मुरूड : प्रतिनिधी

मुरूड नगर परिषद हद्दीतील कोविड लसीकरणाचे काम 85 टक्के पूर्ण झाले आहे. शहरातील 18 वर्षावरील नागरिकांचे लसीकरण 100 टक्के पूर्ण व्हावे या उद्देशाने शहरात राहणार्‍या नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी दि. 18  नोव्हेंबर ते 30 नोव्हेंबरपर्यंत पहिला व दुसरा डोस घेणार्‍या व्यक्तींचे लकी ड्रा काढण्यात येणार आहेत. यामध्ये 20 भाग्यवंतांना कुकर, मिक्सर, घड्याळे, फॅन, इस्री, बॅग आणि म्युझिक सिस्टीम यासारख्या भेटवस्तू देण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा स्नेहा पाटील यांनी दिली.

या अभियानांतर्गत मुरूड ग्रामीण रुग्णालयात लस घेतल्यानंतर संबधितांनी नगर परिषद कार्यालयात नाव नोंदणी करणे गरजेचे आहे. तसेच 6 डिसेंबरला नगर परिषद कार्यालयात लकी ड्रा काढण्यात येणार आहे.

भाग्यवान विजेत्याने लसीकरण प्रमाणपत्रासह वास्तव्याचा पुरावा सादर करणे गरजेचे आहे. तरी सदर अभियानात जास्तीत जास्त नागरिकांनी सहयोग द्यावा, असे आवाहन मुख्याधिकारी पंकज भुसे यांनी केले आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply