कर्जत शहरात कोरोनाचे रुग्ण यांची संख्या गेल्या 15 महिन्यात शून्यावर येऊ शकली नाही. त्यामुळे आता पालिका आणि उपजिल्हा रुग्णालय यांनी प्रत्येक प्रभागात कोरोनाला दूर ठेवण्यासाठी आवश्यक असलेले लसीकरण करण्यावर भर दिला आहे.कर्जत शहर लसीकरण संघर्ष समिती यांच्या पुढाकाराने कर्जत शहरात यावर्षीचा गणेशोत्सव लसीकरण उत्सव झाला आहे.गणेशोत्सवाच्या निमित्ताने कर्जत शहर लसीकरण पूर्ण करून कोरोना मुक्तीकडे वाटचाल करत आहे असेच यानिमित्ताने म्हणावे लागेल. पण यासाठी राजकीय पक्ष, लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांनी लसीकरण संघर्ष समितीच्या आवाहनाला हातात हात घालून कर्जत शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण व्हावे यासाठी करीत असलेले प्रयत्न गणेशाच्या शिकवणीतून आचरण करणारी अशीच आहे.
कर्जत नगरपालिकेच्या हद्दीतील नागरिकांची कोविड लसीकरणासाठी होत असलेली गैरसोय येथील कर्जत उपजिल्हा रुग्णालयात होत आहे.त्यामुळे कर्जत शहरातील नागरिकांचे शिष्टमंडळाने कर्जत नगरपालिका कार्यालयात जाऊन शहरातील प्रत्येक प्रभागात लसीकरणसाठी व्हावे अशी मागणी करणारे निवेदन नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष आणि पालिका मुख्याधिकारी यांची भेट घेतली. ऍडवोकेट कैलास मोरे, राजाभाऊ कोठारी, कृष्णा जाधव, जयवंत म्हसे, विनोद पांडे, अजय वर्धावे, प्रशांत उगले, मन्सूर बोहरी, मनोज निकम या नागरिकांनी यावेळीकर्जत उपजिल्हा रुग्णालयात कर्जत शहरातील नागरिकांना अन्य भागातून आलेल्या लोकांकडून चुकीची वागणूक मिळत आहे.अशा तक्रारी नागरिकांकडून कर्जतच्या नगराध्यक्ष सुवर्णा जोशी,उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल आणि पालिका मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांच्याकडे करण्यात आल्या.नागरिकांच्या समस्या आणि मागणी याबाबत नगराध्यक्ष सुवर्णा जोशी आणि मुख्याधिकारी डॉ पाटील यांनी सकारात्मकता दाखवली आणि सहकार्य करून निश्चित मार्ग काढू असे सांगितले. त्यावेळी मुख्याधिकारी यांनी त्यात काही तांत्रिक मुद्दे आहेत, तसेच लस उपलब्ध होणे हे पण महत्वाचे आहे हे लक्षात घेऊन पालिका नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घेण्यासाठी प्रयत्न करेल असे आश्वासन दिले. डॉक्टर्स, नर्स हे कर्जत उपजिल्हा रुग्णालयात कमी आहेत. त्यामुळे कर्जत शहरातील डॉक्टर्स लसीकरणासाठी सहकार्य केले तर वार्ड प्रमाणे लसीकरण घेता येईल अशी चर्चा झाली. कर्जत शहरातील नागरिकांसाठी ही मोहीम पालिकेने उपजिल्हा रुग्णालय यांचे माध्यमातून राबवावी यासाठी कार्यवाही सुरू करण्याचे आश्वासन नगराध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांनी दिले. शहरातील नागरिकांनी पुढाकार घेतल्यास कर्जत तालुका प्रशासनाला देखील शहरातील प्रत्येक प्रभागात लसीकरण होण्याची कार्यवाही करणे शक्य होऊ शकते अशी प्रतिक्रिया नगराध्यक्ष जोशी यांनी व्यक्त केली.त्याचवेळी आपल्या पालिकेकडून तसा प्रयत्न झाला आहे याची आठवण नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांनी करून दिली.मात्र आपण तात्काळ रायगड जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून घेऊ असे आश्वासन नागरिकांच्या शिष्टमंडळाला दिले होते.मात्र पालिकेच्या हातात लसीकरण केंद्र सुरू करणे शक्य नसल्याने पालिकेने याबाबत उपजिल्हा यांना लसीकरण संघर्ष समितीचे आवाहन आणि विनंती करणारे पत्र दिले.
त्यावेळी प्रत्येक प्रभागात लसीकरण व्हावे यासाठी उपजिल्हा रुग्णालयाला लसीकरणचे कर्जत तालुक्याचे नोडल ऑफिसर असलेले तहसीलदार यांची परवानगी आवशयक असल्याचे माहिती लसीकरण संघर्ष समितीला मिळाली आणि मग लसीकरण संघर्ष समितीने पुन्हा एकदा कर्जत तहसिल कार्यालय गाठले.तेथे कर्जत शहरात पालिका लसीकरण केंद्र उघडून शहरातील सर्व नागरिकांचे लसीकरण करून घेण्यासाठी तयार असल्याचे सांगितले. त्यावेळी तहसीलदार विक्रम देशमुख यांनी उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज बनसोडे आणि कर्जत नगरपरिषद मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील यांच्याशी बोलून योग्य निर्णय घेऊन असा सकारात्मक आश्वासन लसीकरण संघर्ष समितीच्या ऍड कैलाश मोरे, कृष्णा जाधव, जयवंत म्हसे, प्रशांत उगले,राजाभाऊ कोठारी, मुकेश पाटील,यांच्या शिष्टमंडळाला दिले. परंतु कर्जत उपजिल्हा रुग्णालय मधील कंत्राटी पद्धतीने काम करणार्या आरोग्यसेविका यांच्या सेवा शासनाने खंडित केल्याने शहरातील प्रत्येक प्रभागात आणि उपजिल्हा रुग्णालयात लसीकरण करण्यावर परीणाम झाला आहे याची कल्पना तहसीलदार यांना वैद्यकीय अधीक्षक यांच्याकडून देण्यात आली.त्यावेळी नागरिकांची मागणी आणि लसीकरणाची गरज लक्षात घेऊन उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ मनोज बनसोडे यांनी आपल्या सर्व आरोग्यसेविका आणि आरोग्य कर्मचारी यांना विश्वासात घेऊन ऐन गणेशोत्सव काळात लसीकरण महोत्सव साजरा करण्यासाठी तयारी दाखवली.त्यानंतर तहसीलदार विक्रम देशमुख,नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, पालिका मुख्याधिकारी डॉ पंकज पाटील आणि वैद्यकीय अधीक्षक डॉ बनसोडे यांनी कर्जत शहरातील प्रत्येक प्रभागात लसीकरण करून घेण्याबाबत निर्णय घेण्यात आला.
कर्जत नगरपरिषद नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनी स्थानिक नगरसेवक आणि उपजिल्हा रुग्णालय यांच्या माध्यमातून लसीकरण महोत्सव कर्जत शहरात आयोजित करण्यावर एकमत झाले. कर्जत शहरात 9 प्रभाग असून सोयीनुसार लसीकरण केंद्र आयोजित करण्यासाठी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी यांनी सर्व लोकप्रतिनिधी यांच्याबरोबर चर्चा केली आणि कर्जत शहरात सर्व गणेश भक्त गणेशोत्सव साजरा करण्यात दंग असताना प्रत्येक प्रभागात लसीकरण मोहीम राबविण्याची तयारी पूर्ण झाली आणि कर्जत शहरात गणेशोत्सव सुरू झाल्यावर दुसर्या दिवसापासून लसीकरण मोहीम प्रत्येक प्रभागात राबविली जाऊ लागली आहे.कर्जत शहरात नऊ प्रभाग असले तरी 18 नगरसेवक आणि दोन स्वीकृत नगरसेवक पालिकेतील लोकप्रतिनिधीत्व करीत असल्याने केवळ नऊ प्रभागात नाही तर जे लोकप्रतिनिधी लसीकरण करून घेण्यासाठी शिबिर आयोजित करण्यासाठी पुढाकार घेतील त्या सर्वांनी शिबिर आयोजित करून कर्जत शहर कोरोना मुक्तिकडे नेण्यासाठी हातभार लावण्याचे आवाहन लसीकरण संघर्ष समितीने केले आहे.त्यामुळे कर्जत शहरात 11 सप्टेंबर पासून लसीकरण शिबिरे आयोजित होऊ लागली आहेत.11 सप्टेंबर रोजी गुंडगे,म्हाडा कॉलनी आणि नाना मास्तर नगर मध्ये स्थानिक नगरसेवक यांनी लसीकरण शिबिर आयोजित केली.नगरसेविका वैशाली मोरे, स्वामींनी मांजरे, संचिता पाटील यांनी लसीकरण शिबिरे आयोजित करून आपल्या प्रभागातील जनतेला कोविशिल्ड आणि कोव्हक्सीन लसीकरणचे डोस उपलब्ध करून दिले होते.12 सप्टेंबर रोजी कर्जत शहरातील प्रभाग सात मध्ये हनुमान मंदिर येथे नगरसेविका मधुरा चंदन, नगरसेवक राहुल डाळिंबकर यांनी बौद्ध समाज मंदिर तर स्वीकृत नगरसेवक संकेत भासे यांनी दहिवली संजयनगर येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यलयात लसीकरण शिबिर सुरू आहे. कर्जत शहरात लसीकरण महोत्सवात पुढील सात दिवसात संपूर्ण शहरात लसीकरण शिबिरे आयोजित केली जाणार आहेत.लसीकरण शिबिरांचे माध्यमातून कर्जत धहरात लसीकरण महोत्सव साजरा होत असून कोरोना ला कर्जत शहरातून दूर ढकलण्यासाठी हा महोत्सव महत्वाचा ठरणार आहे.
कर्जत नगरपरिषदने एप्रिल महिन्यात शहरातील तीन भागात लसीकरण केंद्र सुरू करण्याची तयारी दर्शवली होती.त्यासाठी जागा देखील उपलब्ध झाली होती,मात्र अभिनव प्रशाळेतील एका दिवसाच्या लसीकरण केंद्रानंतर उपजिल्हा रुग्णालय कडून असहकाराची भूमिका घेण्यात आली होती.त्यामुळे शहरात लसीकरण मंदावले होते,मात्र दररोज होणारी गर्दी आणि त्यात कर्जत शहाराबाहेर तालुक्यात अनेक ठिकाणी लसीकरण सुरू असताना देखील शहराबाहेरील लोकांची होणारी गर्दी लक्ष्यात घेऊन कर्जत मधील नागरिक लसीकरण करून घेण्यासाठी धावपळ करताना दिसत होते.त्यात कर्जत तालुक्याबाहेरील लोकांची लसीकरण करून घेण्यासाठी पहाटे पासून होणारी गर्दी पाहून कर्जत तालुक्यात संताप व्यक्त केला जाऊ लागला होता.आपल्या शहरातील आणि आजूबाजूच्या गावातील लोकांची लसीकरण करून घेण्यासाठी होणारी धावपळ पाहून लसीकरण संघर्ष समितीची निर्मिती झाली.या समितीने अत्यंत योग्य पद्धतीने कर्जत शहरातील प्रत्येक विभागात लसीकरण करून घेण्यासाठी केलेली नियोजनबद्ध वाटचाल आणि त्यासाठी घेतलेला सततचा पाठपुरावा यामुळे कर्जत शहरात लसीकरण महोत्सव आयोजित झाला आहे.या महोत्सवाच्या निमित्ताने कर्जत कोरोना मुक्तीकडे पुढचे पाऊल टाकत आहे.त्यात उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ मनोज बनसोडे आणि शहराच्या प्रथम नागरिक सुवर्णा जोशी यांनी शहरातील प्रत्येक भागात लसीकरणाच्या ठिकाणी पोहचवून सर्व व्यवस्था पोहोचते काय?यावर जातीने लक्ष देत आहेत यामुळे हा महोत्सव होण्यात गणेशाचे आशीर्वाद लाभत असल्याचे बोलले जाऊ लागले आहेत.पण या सर्वांच्या प्रयत्नाने कर्जत शहरातील नागरिकांचे लसीकरण होत आहे असेच म्हणावे लागेल.
-संतोष पेरणे, खबरबात
RamPrahar – The Panvel Daily Paper