Breaking News

लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात सात लाख रिक्षा चालक अडचणीत

पनवेल : वार्ताहर

सध्या देशभर कोरोना व्हायरसने धुमाकुळ घातला असुन 14 मार्चपर्यत लॉकडाऊन आहे. बर्‍याच रिक्षा चालकांचे हातावर पोट आहे. रोजच्या दैनंदिन उत्पन्नावर त्यांचे कुटुंब चालते. गेल्या दहा बारा दिवसापासून रिक्षा बंद असल्याने आर्थिक उत्पन्न बंद

झाले आहे.

अगोदरच रिक्षा परमिट खुले केल्यामुळे रिक्षाची वाढ झाली रिक्षा व्यवसाय कमी झाला हप्ते भरायला अडचण निर्माण झाली होती रिक्षा व्यवसाय करून घर चालवणे कठीण झाले. आता लॉकडाऊनमुळे पूर्ण रिक्षा व्यवसाय बंद झाल्याने रिक्षा चालकावर उपासमारीचा वेळ आली असून रिक्षावर असलेल्या कर्जाचे हप्ते फेडणे कठीण झाले आहे. सरकारने बँकेला सूचना दिल्या असतानाही काही बँकांनी त्यांचे हफ्ते पुढे केले परंतु अशा अनेक बँका व फायनांस कंपन्या आहेत ज्या अजून रिक्षाचे हफ्ते थांबवत नसल्याने आत्ता रिक्षा चालक चिंतेत आला आहे. व्यवसाय सुरु नसल्याने हफ्ते भरायचे कसे व रोजचा घरचा खर्च चालवायचा कसा असा प्रश्न निर्माण झाला आहे.यासंदर्भात महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे प्रसिध्दीप्रमुख संतोष शिवदास आमले व महाराष्ट्र उपाध्यक्ष बाळासाहेब जगदाळे यांनी आपण ही रिक्षा कर्जाचे हफ्ते पुढे ढकलावे अशी विनंती बँक आणि फायनान्स यांना केली. त्यामूळे राज्यशासनाने मुंबई पनवेल व इतर ठिकाणी राज्यात असलेल्या रिक्षा चालकांची व त्यांच्या कुंटुबियांची चाललेली हालहापेष्ठा थांबविण्यासाठी रिक्षावर असणार्‍या कर्जाच्या हप्त्यासाठी फायन्ससवाल्यांनी वेठीस धरु नये. याबाबत त्वरीत निर्णय घेण्याची मागणी महाराष्ट्र रिक्षा पंचायतचे प्रसिद्धीप्रमुख संतोष शिवदास आमले केली आहे.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply