Breaking News

लॉकडाऊनमुळे हातावर पोट असणारे उपाशी

जेवणाची व्यवस्था करण्याची मागणी

पनवेल : बातमीदार : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 14 एप्रिलपर्यंत लॉकडाऊनची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी (दि. 24) केली. त्याला परिसरात त्याला चांगला प्रतिसाद मिळत असून नागरिक घरातच बसून आहेत, मात्र याचा फटका हातावर पोट असणार्‍या नागरिकांना बसत असून त्यांना एका वेळच्या जेवणाची देखील भ्रांत आहे. त्यामुळे प्रशासनाने त्यांच्या जेवणाची व अन्नधान्याची व्यवस्था करावी अशी मागणी केली जात आहे.

लॉकडाऊनमुळे पनवेल शहरासह तालुक्यातील देखील दुकाने बंद आहेत. पनवेल रेल्वे स्टेशनजवळ जाणार्‍या रस्त्यावर दररोज हातावर पोट असणारे नागरिक छोटा-मोठा व्यवसाय करतात. मात्र या लॉकडाऊन परिस्थितीमुळे त्यांना एक वेळचे जेवण देखील मिळत नाही. अशी व्यथा अलका रमेश कांबळे यांनी मांडली. प्रशासनाने याची दखल घेऊन त्यांची जेवणाची व अन्नधान्याची व्यवस्था करावी अशी मागणी कांबळे यांनी केली आहे. अशीच परिस्थिती सभोवतालच्या भिकार्‍यांवर देखील ओढवली आहे. दररोज भीक मागून जगणारे भिकारी यांच्यावर देखील उपासमारीची वेळ आली आहे, या परिस्थितीमुळे नागरिक रस्त्यावर येत नसल्याने भिकारी देखील अन्नावाचून

तडफडत आहेत.

पोलिसांनी दाखविली माणुसकी

पनवेल : प्रतिनिधी : पनवेलमध्ये लॉकडाऊनमुळे बेघर आणि भिक्षेकरींवर उपासमारीची पाळी आलेली आहे. गुडीपाडव्याच्या दिवशी पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांनी अशा व्यक्तींना अन्न देऊन कडक शिस्तीच्या पोलिसांत ही माणुसकी असल्याचे दर्शन घडवले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनावर नियंत्रण आणण्यासाठी मंगळवारी (दि. 24) मध्यरात्रीपासून देशात 21 दिवस लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे पनवेलमधील हॉटेल, खानवळी, रस्त्यावरील गरिबांचा आधार असलेल्या चायनीज आणि वडापावच्या गाड्या बंद झाल्या.  शहराचा विस्तार झपाट्याने होत असल्याने पनवेलमध्ये मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. त्याठिकाणी कामासाठी बाहेरच्या राज्यातील अनेक मजूर आलेले आहेत. त्यांना खाण्यासाठी चायनीज आणि वडापावच्या गाड्याचा आधार होता. आता काम बंद झाल्याने हातावर पोट असलेल्या या मजुरांना मजुरी नाही. त्यातच आता खाण्यासाठी काही मिळत नसल्याने त्यांची उपासमार होत आहे.

त्यातच पनवेल हे कोकण रेल्वेचे महत्वाचे स्टेशन असल्याने या ठिकाणी  भिक्षेकर्‍यांची संख्या ही मोठी आहे. त्यांना ही बंदचा फटका बसल्याने उपासमारीची पाळी आली आहे. पनवेलचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र गिड्डे यांना बुधवारी पनवेलमध्ये गस्त घालताना या लोकांची विदारक अवस्था पाहून खाकी वर्दीतील त्यांच्यातील माणूस जागृत झाला. त्यांनी आपल्या सहकार्‍यांसह त्यांच्यासाठी जेवण मागवून स्वत: त्याचे वाटप केले. त्यामुळे या लोकांना नेहमी आपल्यावर डाफरणार्‍या पोलिसांकडून गुढीपाडव्याच्या दिवशी अन्न मिळाल्याने आनंद झाल्याचे त्यांच्या चेहर्‍यावर दिसत होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply