Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते आरती संग्रहांचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त
गणेशोत्सवाच्या पार्श्वभुमीवर देवद ग्रामपंचायतीचे सरपंच विनोद वाघमारे, महाराष्ट्र प्रदेश वाहतूक संघटनेचे अध्यक्ष प्रभुदास भोईर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुरेश भोईर तसेच माजी उपसरपंच अरुण पाटील आणि युवा मोर्चा उपाध्यक्ष धनंजय पाटील यांनी सुंदर व भक्तिपूर्ण आरती संग्रह तयार केले आहेत. या आरती संग्रहांचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि.26) झाले.
या वेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस नितीन पाटील, जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील, पनवेल पूर्व मंडळ अध्यक्ष भुपेंद्र पाटील, कळंबोली मंडळ अध्यक्ष अमर पाटील, माजी नगरसेवक बबन मुकादम, सरपंच विनोद वाघमारे, युवा मोर्चा तालुका सरचिटणीस विश्वजीत पाटील, अविनाश गायकर, निशांथ गिल, राम वाघमारे, अवीत वाघमारे, प्रविण वाघमारे, कमलाकर भोईर, मिन्नाथ भोईर, अंकुश भोईर, अमर उलवेकर, सुरज गोंधळी, शंकुनाथ भोईर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान, भाजप पनवेल शहर उपाध्यक्ष केदार भगत यांच्या आरती संग्रहाचे प्रकाशन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी केदार भगत मित्र परिवार उपस्थित होता.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply