पनवेल : रामप्रहर वृत्त
सीबीएसई अर्थात केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेला इयत्ता दहावीच्या परीक्षेत रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलचा निकाल पहिल्याच वर्षी 100 टक्के लागला आहे. या यशाबद्दल ‘रयत’चे मॅनेजिंग कौन्सिल सदस्य, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन केले.
विद्यालयातून 37 विद्यार्थी परीक्षेस बसले होते. सर्वच्या सर्व उत्तीर्ण झाले. त्यापैकी सात विद्यार्थ्यांना 90%पेक्षा अधिक गुण प्राप्त झाले आहेत. 18 विद्यार्थी प्राविण्यासह प्रथम श्रेणीत, 10 विद्यार्थी प्रथम व दोन विद्यार्थी द्वितीय श्रेणीत उत्तीर्ण झाले आहेत. प्रणाली आनंदा देसाई या विद्यार्थिनीने 95% गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. वेदांत बागल व जय झांजुर्णे यांनी 94.6% गुण मिळवून संयुक्त द्वितीय, तर श्रावणी राजेश रिकामे हिने 94.2% गुण मिळवून तृतीय क्रमांक प्राप्त केला. साईअमृता घनतासला 92.6% गुण मिळवून चौथी व सुमित संदीप घायाळकर 91.6% गुण मिळवून पाचवा आला. सर्व विद्यार्थ्यांना प्राचार्य अविनाश कुलकर्णी, पर्यवेक्षिका रूहल दुबे आणि शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले.
या यशाबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अभिनंदन करीत आनंद व्यक्त केला. या वेळी प्राचार्य अविनाश कुलकर्णी, स्वप्नाली म्हात्रे, पीआरओ बाळासाहेब कारंडे, हेड क्लर्क दत्ता कुटे उपस्थित होते. दरम्यान, विद्यालयाचे चेअरमन आमदार प्रशांत ठाकूर यांनीही अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper