Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शिवाजीनगरमध्ये श्रीगणेश, जरी मरी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा उत्साहात

पनवेल ः रामप्रहर वृत्त
पनवेल तालुक्यातील शिवाजीनगर येथील श्री जरी मरी माता मंदिर (मठ)मधील श्री गणेश व श्री जरी मरी माता मूर्ती प्राणप्रतिष्ठापना सोहळा 7 आणि 8 ऑक्टोबरला साजरा झाला. त्या अंतर्गत माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि श्री पिरयोगी गणेशनाथ यांच्या हस्ते श्री गणेश व श्री जरी मरी मातेच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. या सोहळ्याला भाजपचे शिवाजीनगर अध्यक्ष कृष्णाशेठ ठाकूर, पं. स. सदस्य तथा महिला मोर्चा पनवेल तालुकाध्यक्ष रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत, ज्येष्ठ कार्यकर्ते भाऊ कडू, गजानन ठाकूर, किशोर ठाकूर, अमित कडू, जितेंद्र कडू, जरी मरी मित्र मंडळाचे अध्यक्ष विनोद कडू, वैभव ठाकूर, सुजीत ठाकूर, नंदा ठाकूर, विक्रम ठाकूर, मनीषा ठाकूर, विजय ठाकूर, कुसूम ठाकूर, विनंती ठाकूर, सुदीप ठाकूर, शशिकांत ठाकूर, चंद्रकांत ठाकूर, गुंजाबाई ठाकूर, व्ही. के. ठाकूर, रतन ठाकूर, प्रल्हाद ठाकूर, आशा म्हात्रे, गजानन ठाकूर, किशोर ठाकूर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. या वेळी विविध धार्मिक कार्यक्रम झाले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply