Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते डॉ. बोरकरर्स हॉस्पिटलचे उद्घाटन

पनवेल ः रामप्रहर वृत्त

उलवे नोडमध्ये वाढते नागरिकरण लक्षात घेता, सेक्टर 8 येथील कस्तुरी हेरिटेजमध्ये डॉ. बोरकरर्स मदरकेअर मॅटेर्निटी आणि सर्जिकर हॉस्पिटल नव्याने सुरू झाले आहे. या हॉस्पिटलचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. 15) उद्घाटन झाले.

या वेळी त्यांनी बोरकर दांपत्यांला पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या. या वेळी गव्हाण उपसरपंच विजय घरत, भाजपचे उलवे नोड उपाध्यक्ष अनंता ठाकूर, उलवे नोड महिला मोर्चाध्यक्षा तथा ग्रा. पं. सदस्या योगीता भगत, किशोर पाटील, उलवे नोड चिटणीस भाऊ भोईर, महिला मोर्चा उपाध्यक्षा सुजाता पाटील, अशीष घरत, संदीप म्हात्रे, सुधिर भगत, शिवाजी नगर उपाध्यक्ष व्ही. के. ठाकूर, रामभाऊ बोरकर, दुर्गा बोरकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply