पनवेल ः रामप्रहर वृत्त
माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी शनिवारी (दि. 20) रयत शिक्षण संस्थेच्या पनवेल तालुक्यातील न्हावे येथील न्यू इंग्लिश स्कूल येथे भेट देऊन नूतन इमारतीची पाहणी केली. या वेळी त्यांनी उर्वरित काम टीआयपीएल कंपनीकडून पूर्ण करून देण्याचे जाहीर केले तसेच विद्यालयासाठी सुसज्ज व अद्ययावत प्रयोगशाळा, संगणक कक्ष आणि ग्रंथालय बांधण्यास 50 लाख रुपयांची देणगी जाहीर केली.
या वेळी ‘रयत’चे जनरल बॉडी सदस्य वाय. टी. देशमुख, न्हावे ग्रामपंचायतीचे सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे, विद्यालयाचे चेअरमन चंद्रकांत भोईर, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, स्कूल कमिटी सदस्य आर. ए. म्हात्रे, चंद्रकांत पाटील, मोरेश्वर पाटील, मोरेश्वर पाटील, बाळूशेठ भोईर, विशाल भोईर, दीपक भोईर, भाजप गाव कमिटी अध्यक्ष तुषार भोईर, ग्रामपंचायत सदस्य सागरशेठ ठाकूर, देवेंद्र भोईर, सी. एल. ठाकूर, राम मोकल, विजय घरत, किशोर पाटील, अनिल भोईर, रूपेश घरत, जयंत पाटील, नितीन भोईर, मीनाक्षी पाटील, रंजना घरत, जॉर्ज मिनीजिस, विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रमोद कोळी, माजी मुख्याध्यापक जी. एम. कोळी, ‘रयत’चे लाईफ मेंबर रवींद्र भोईर, महिला मंडळ अध्यक्ष मीनाक्षी पाटील आदी उपस्थित होते.
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या 30 लाख रुपये अर्थसहाय्यातून न्हावे गावासाठी जलकुंभ बांधण्यात आला आहे. या जलकुंभाची तसेच लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या खासदार निधीतून बांधण्यात आलेल्या समाजमंदिराचे नूतनीकरण व वनिता महिला मंडळासाठी उभारण्यात आलेल्या कार्यालयाच्या कामाचीही लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांनी पाहणी केली. शैक्षणिक, सामाजिक कार्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सरपंच हरिश्चंद्र म्हात्रे व ग्रामस्थांनी लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे आभार मानले.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper