Breaking News

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते महेंद्र घरत यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

पनवेल : रामप्रहर वृत्त
महेंद्र घरत हे हरहुन्नरी व्यक्तीमत्व आहे. त्यांना मिळालेल्या प्रत्येक संधीचे सोनं त्यांनी केले, असे गौरोद्गार माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी परदेश प्रवासाची पंचविशी या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यावेळी केले.
काँग्रेसचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी 2000 साला पासून परदेश प्रवसाला सुरुवात केली असून यंदाच्या वर्षी या प्रवासाला 25 वर्षे पुर्ण झाली आहे. त्यानुसार त्यांनी परदेश प्रवासाठी पंवविशी हे पुस्तक प्रकाशित केले आहे. या पुस्तकामध्ये त्यांनी त्यांच्या आत्ता पर्यंतच्या परदेश प्रवासाचा अनुभव मांडला आहे. दरम्यान शनिवारी शेलघर येथे या पुस्तकाच प्रकाशन सोहळा पार पडला. या वेळी माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करुन जुन्या आठवणींना उजाळा दिला. या प्रकाशन सोहळ्यावेळी भाजपचे ज्येष्ठनेते जे.एम.म्हात्रे, शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील, संदीप चव्हाण, दिनेश लाड, वाय.टी.देशमुख, भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, भुषण पाटील, भारती पवार यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply