पनवेल : रामप्रहर वृत्त
शिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि भाजप जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न सुटतील, असा विश्वास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उलवे नोडमध्ये व्यक्त करून सर्वांनी एकत्रित येऊन काम करावे, असे प्रतिपादन केले.
उलवे नोड सेक्टर सेक्टर 6 येथे शिवसंघर्ष प्रतिष्ठान आणि भाजप जनसंपर्क कार्यालय अखिलेश यादव यांनी सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि भाजपचे ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे यांच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी (दि. 20) झाले. त्या वेळी ते बोलत होते.
या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, माजी उपसरपंच अमर म्हात्रे, निलेश खारकर, धीरज ओवळेकर, अखिलेश यादव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि इतर उपस्थित होते. या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी अखिलेश यादव यांच्या माध्यमातून राबवण्यात येणार्या सामाजिक कार्याचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper