पनवेल ः रामप्रहर वृत्त
मासेमारी करणार्या कष्टकरी बांधवांना सरकारचे आणि कायद्याचे संरक्षण मिळणे गरजेचे असून नांदाई माता मच्छीमार सहकारी संस्थेच्या स्थापनेमुळे हे कवच आता स्थानिक मच्छीमारांना उपलब्ध होणार आहे, असे प्रतिपादन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कोंबडभुजे येथे केले.
कोंबडभुजे येथे नव्याने नांदाई माता मच्छीमार वि.का. सहकारी संस्था स्थापन झाली आहे. या संस्थेचे उद्घाटन लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते सोमवारी (दि. 19) झाले. या वेळी बोलताना त्यांनी मच्छीमारांच्या संघर्षाची जाणीव करून दिली. मच्छीमारांचे जीवन अत्यंत कष्टाचे असून त्यांना सातत्याने नैसर्गिक आपत्ती आणि विविध समस्यांचा सामना करत आपला व्यवसाय करावा लागतो, असे त्यांनी नमूद केले.
केंद्र आणि राज्य सरकारमार्फत मच्छीमारांसाठी अनेक कल्याणकारी योजना राबवल्या जातात. या सर्व योजनांचा लाभ नांदाई माता संस्थेच्या माध्यमातून थेट मच्छीमार बांधवांपर्यंत पोहचवणे सुलभ होईल, असे सांगून हा व्यवसाय कायदेशीर चौकटीत बसवण्यासाठी संस्थेची स्थापना करण्यात सतीश कोळी यांनी घेतलेल्या पुढाकाराचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी कौतुक केले.
उद्घाटन समारंभाला ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे, माजी सरपंच जितेंद्र म्हात्रे, निलेश खारकर, संस्थेचे चेअरमन सतीश कोळी, सचिव देवधर कोळी यांच्यासह नरहरी कोळी, अनिकेत भगत, शैलेश भगत, वितेश म्हात्रे, रूपेश मोहिते, उत्तम कोळी, गुलाब म्हात्रे, अखिलेश यादव, मच्छिंद्र कोळी, सुजित मोकल, मार्तंड नाखवा, रमेश ठाकूर, विजय घरत, प्रणय कोळी, नामदेव ठाकूर, माणिक कोळी, वामनशेठ म्हात्रे, हरिश्चंद्र भोईर आदी पदाधिकारी व विविध संस्थांचे चेअरमन उपस्थित होते.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper