लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून वूमन्स प्रेस ऑर्गनायझेशनला मदत

पनवेल : वार्ताहर

पनवेलमधील पत्रकारितेत कार्यरत असणार्‍या महिला पत्रकारांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी मदतीचा हात दिला आहे. तसेच त्यांना सर्वतोपरी मदतही केली आहे. सध्या सुरू असलेल्या कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्याच्या या लढाईत 31 मेपर्यंत सर्व जनता लॉकडाऊनमध्ये आहे. लॉकडाऊनची परिस्थिती आणखी किती दिवस राहील याबद्दल साशंकता आहे. अशातच पनवेलमधील महिला पत्रकार आपले घर सांभाळून वृत्तांकन करीत आहे. त्यांना सुद्धा आर्थिक अडीअडचणीला सामोरे जावे लागत आहे. याची जाणीव ठेवूनच लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी वूमन्स प्रेस ऑर्गनायझेशन या संस्थेला आर्थिक मदत केली असून या मदतीबद्दल लोकनेते रामशेठ ठाकूर यांचे संस्थेच्या अध्यक्षा रुपाली शिंदे यांनी आभार मानले आहेत.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply