
उरण : वार्ताहर
वटपौर्णिमा शुक्रवारी (दि. 5) रोजी असल्याने वटवृक्षाची पूजा करण्यासाठी लागणार्या पुजेच्या सामुग्री खरेदी करण्यासाठी उरण बाजारात महिलांची लगबग दिसत होती. कोरोना रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये. त्यासाठी राज्यात सर्वत्र लॉकडाऊन असल्याने उरण बाजारात कर्नाटक, रत्नागिरी कोकण येथून येणारे फणस यंदा न आल्याने बाजारात फणस, फणसाचे गरे गायब झालेले पहावयास मिळाले. वटपौर्णिमेला वट वृक्षाची पुजेसाठी फणसाचे महत्व अधिक असते. परंतु यंदा कोरोना संकटामुळे फणस व फणसाचे गरे गायब झाल्याचे चित्र सर्वत्र दिसले. पुजेसाठी लागणारे आंबे (लहान) 100 रुपये डझन वडाच्या पानांची फांदी 10 रुपये, करवंदे 10 रुपये वाटा, जांभळे 20 रुपये वाटा, नारळ 20 रुपये (एक नग), करंडा फनी 20 रुपये, खायची पाने 10 रुपयाला 10, आवळा 10 रुपयास (दोन नग) अशा दराने बाजारात विकली जात आहेत, असे करवंदे व वडाची पाने विक्रेती मीनल मंगेश माळी यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper