Breaking News

वडिलांची काळजी घेत ‘तो’ खेळतोय सामने

मुंबई : प्रतिनिधी

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा खेळाडू पार्थिव पटेल सध्या आपल्या व्यक्तिगत जीवनातील अडचणींचा सामना करत आहे. तरी देखील पार्थिव पटेल लक्ष देऊन टीमकडून खेळत आहे. त्याचे वडील हॉस्पिटलमध्ये जीवन-मरणाशी संघर्ष करीत आहेत, ती त्याच्यासाठी सर्वात जास्त चिंतेची बाब आहे. पार्थिवचे वडील गुजरातमधील अहमदाबादमध्ये ब्रेम हॅमरेजशी लढत आहेत. पार्थिव सामना संपल्यानंतर अहमदाबादला जातो, आपल्या वडिलांच्या तब्यतीची विचारपूस केल्यानंतर पुन्हा पुढील सामन्याला हजर राहतो. यासाठी पार्थिव पटेलला टीमकडून विशेष बाब म्हणून परवानगी मिळाली आहे.

पार्थिव म्हणतो, माझे वडील अजय हे आयसीयूमध्ये दाखल आहेत, ते कोमातून कधी-कधी बाहेर येतात. जेव्हा सामना सुरू असतो, तेव्हा माझ्या डोक्यात कोणतेही विचार नसतात. कारण तेव्हा आमच्याकडे मोबाईल फोन देखील नसतो, पण मैदानाच्या बाहेर आल्यानंतर मी सतत वडिलांच्या तब्येतीची विचारपूस करत असतो. डॉक्टरांच्या संपर्कात असतो. माझी आई आणि पत्नी जरी घरी असले, तरी काही महत्त्वाचे निर्णय डॉक्टरांशी बोलून मला घ्यावे लागतात.

मी आयपीएल-12 हा सिझन खेळणार नव्हतो, पण माझ्या बाबांची इच्छा होती की मी खेळावं. म्हणून मी खेळत आहे. आशीष नेहरा मला या बाबतीत भावनिक साथ देत असतो. मुश्ताक अली टुर्नामेंटमध्ये खेळणं मी बाबांची काळजी घेण्यासाठीच टाळलं होतं.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply