पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्य शासनाच्या वनमहोत्सव सप्ताहातंर्गत अलिबाग वनविभाग पनवेल वनपरिक्षेत्रातील पळस्पे येथे रविवारी (दि. 2) आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या वेळी झाडे लावा, झाडे जगवा असा संदेश देण्यात आला.
या कार्यक्रमास पनवेल वनपरिक्षेत्र सहाय्यक वन संरक्षक संजय वाघमोडे, वन परिक्षेत्र अधिकारी निलेश भुजबळ, वन परिमंडळ अधिकारी अशोक घुगे, अधिकारी, कर्मचारी, भाजप तालुका सरचिटणीस राजेंद्र पाटील, केळवणे जि.प. विभागीय अध्यक्ष मंगेश वाकडीकर, पळस्पेचे माजी सरपंच रघुनाथ गवंडी, भाजप पळस्पे पं.स. विभागीय अध्यक्ष सुनील गवंडी, माजी उपसरपंच विजय गवंडी, अजय तेजे, युवा मोर्चा तालुकाध्यक्ष तथा शिवकरचे सरपंच आनंद ढवळे, युवा मोर्चा पं.स. विभागीय अध्यक्ष अध्यक्ष स्वप्नील फौजदार, चिखले ग्रामपंचायतीचे सरपंच नामदेव पाटील, गिरवले ग्रामपंचायतीचे माजी सरपंच राम हातमोडे, सांगुर्ली ग्रामपंचायतीचे सदस्य शरद वांगिलकर, नांदगावचे माजी सरपंच अविनाश गायकर, युवा नेते अॅड. निलेश हातमोडे, विशाल गायकर, घनश्याम गवंडी, रमेश गडकरी, सागर गवंडी, पीयुष गवंडी आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
Check Also
ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम
पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …
RamPrahar – The Panvel Daily Paper