वर्तमानपत्राचा कागद खाद्यपदार्थ ठेवण्यास वापरू नका; अन्न व औषध प्रशासन विभागाचा इशारा

मुंबई : प्रतिनिधी

वर्तमानपत्राचा वापर खाद्यपदार्थ पॅकिंगसाठी करण्यात येऊ नये. अशा इशारा अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहआयुक्त शि. स. देसाई यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिला आहे. अन्नसुरक्षा व मानदे कायदा 2006 हा महाराष्ट्रासह संपूर्ण देशात 5 ऑगस्ट 2011पासून लागू करण्यात आला. या कायद्याचा प्रमुख उद्देश जनतेला सुरक्षित, सकस व निर्भेळ अन्न उपलब्ध करून देणे हा आहे. अनेकदा लोक बाहेरून नाष्टा मागवितात. त्या वेळी अन्न व्यावसायिक वडापाव, पोहे यासारखे अन्नपदार्थ वर्तमानपत्रात बांधून देतात. त्यामुळे आरोग्याला धोका निर्माण होतो. वृत्तपत्राची शाई केमिकलपासून बनविलेली असते. त्यामुळे वृत्तपत्रात गरम खाद्यपदार्थ पॅकिंग करणे व ग्राहकांना देणे धोकादायक आहे.

Check Also

केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा

पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …

Leave a Reply