उरण : प्रतिनिधी, बातमीदार
वशेणी इतिहास संपादकीय मंडळाचे सदस्य आणि सेवाभावी व्यक्तीमत्व म्हणून परिसरात ओळख असणारे डॉ. शरद गणपत पाटील यांचे नुकतेच निधन झाले. त्याना श्रद्धांजली देण्यासाठी वशेणी इतिहास संपादकीय मंडळाने बारावीच्या गरजू मुलांना मोफत पाठ्यपुस्तक वाटप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी सामाजिक कार्यकर्ते निलेश भरत म्हात्रे, माजी पं. स. सदस्य लवेश म्हात्रे, वशेणी गावचे पोलीस पाटील दीपक पाटील, ग्रामपंचायत सदस्य संदेश गावंड, मूर्तीकार जगन्नाथ म्हात्रे, राहूल पाटील, बळीराम म्हात्रे, गणेश खोत, अनंत तांडेल, विश्वास पाटील, रघुनाथ पाटील, नितीन पाटील, पुरूषोत्तम पाटील आदी उपस्थित होते. प्रास्ताविक मच्छिंद्रनाथ म्हात्रे यांनी केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper