Breaking News

वाढदिवसानिमित्त केले वृक्षारोपण

उरण : वार्ताहर

भारतीय जनता पक्ष उरण तालुका महिला उपाध्यक्षा निर्मला घरत यांचा वाढदिवस शनिवार (दि. 15) वृक्षारोपण करुन साजरा करण्यात आला. निर्मला घरत यांनी या वेळी वृक्षारोपण करून वृक्षाचे महत्व पटवुन दिले आहे. त्यांनी उरण तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सावरखार येथील पटांगण येथे व इतर ठिकाणी वृक्षारोपण केले. तसेच वृक्षारोपण करणे हि काळाची गरज आहे. झाडे मानवाला खूप काही देतात. सर्वत्र प्रदूषणाचे प्रमाण वाढले आहे त्यासाठी झाडे लावा. झाडे जगवा. फक्त झाडे लावून चालणार नाही ती वाढविली पाहिजेत. त्यांचे संवर्धन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले या वेळी भाजप महिला कार्यकर्त्या काशीबाई घरत, कमला घरत, अश्विनी घरत, निर्मला सुनील घरत, कुसुम आंबोरे आदी उपस्थित होत्या.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply